रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी रविंद्र राजाराम पवार यांची दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दैनिक सामना मध्ये प्रसिद्धी पत्रकामधून नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीने करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती बाबत लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हाप्रमुख दीपकसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख अनिन काकडे, यांचे शिफारशी ने करण्यात आली असून नियुक्ती बाबत शिवसेनेचे अशोक शिंदे, नितीन महाजन, अविनाश पाटील, राकेश घोरपडे, संतोष महाजन,निलेश महाजन, सुधाकर महाजन, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सचिन पाटील उपसभापती.योगेश पाटील संचालक डॉक्टर.राजेंद्र पाटील सोबत योगीराज पाटील, सोपान साहेबराव पाटील,राजेंद्र चौधरी भिका चौधरी, रोहीत अग्रवाल यांनी सदर नियुक्ती बद्दल रविंद्र राजाराम पवार* यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.