धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भोणे परिसरात रविवारी अचानकपणे झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शासनाने नुकग्रस्तभागाचा पंचनामा करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
जळगाव तालुक्यात रविवारी रात्री अचानकपणे काही भागात आवकाळी गारपीट झाली आहे. तसेच धरणगाव तालुक्यातील भोणे येथे रविवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. रात्री अचानकपणे झालेल्या गारपीट व पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, बाजरी यांचे नुकसान होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. दादरची कणसे काळे पडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेडनेटचेही अनेक गावांत नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादक धास्तावले आहेत.