Home Cities पाचोरा माजी आमदार आर.ओ. पाटील यांचे निधन

माजी आमदार आर.ओ. पाटील यांचे निधन

0
43

पाचोरा प्रतिनिधी । येथील माजी आमदार तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आर.ओ. पाटील यांचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.

आर.ओ. तात्या पाटील यांच्यावर गत अनेक दिवसांपासून मुंबई येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. आज पहाटे चार वाजेच्ये सुमारास त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. आर.ओ. तात्या यांनी उद्योजकतेसोबत राजकारणातही यश संपादन केले होते. ते निर्मल सीडस् या ख्यातप्राप्त कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. तसेच त्यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता अंतीम संस्कार करण्यात येत आहेत. तात्यांच्या निधनाचे वृत्त येताच राजकीय व सामाजिक वर्तुळात शोकलहर पसरली आहे. ते आमदार किशोरआप्पा पाटील यांचे काका होत. लाईव्ह ट्रेंडस् न्यूज परिवारातर्फे आदरांजली. ईश्‍वर त्यांना सदगती देवो आणि पाटील कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound