Home क्राईम शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांवर गुन्हा दाखल

शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांवर गुन्हा दाखल


पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसरातून शाळेत आणि खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या दोन टवाळखोरांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून ती शिक्षण घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती जेव्हा जेव्हा वरखेडी नाका ते भारत डेअरी बसस्टॉप या दरम्यान ट्यूशनला किंवा कामासाठी जात असे, तेव्हा संशयित आरोपी गणेश संजय महाजन आणि गोलू बापू महाजन (दोघे रा. वरखेडी नाका, पाचोरा) यांनी तिचा पाठलाग करत असत. हे दोन्ही आरोपी मुलीकडे एकटक बघून अश्लील हावभाव करणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे आणि शिट्ट्या वाजवून तिला त्रास देत होते. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound