खडकाई नदीवरील पुलाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह : निवेदनाद्वारे तक्रार दाखल ( व्हिडीओ )

yawal

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील सातोद-कोळवद या गावाकडुन जाणाऱ्या खडकाई नदीवर गेल्या काही दिवसांपासुन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम शासकीय निविदेप्रमाणे होत नसल्याने कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेक प्रश्न स्थानिक नागरिक व यावल पंचायत समितीचे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या कामाविषयी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारही केली आहे.

 

या संदर्भात शेखर पाटील यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल ते वड्री रस्त्यावरील कोळवद वड्री मार्गावर असलेल्या हडकाई नदीवर सुमारे ७४ लाख रुपये निधी खर्चातुन नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, सदरचे काम ठेकेदार हा अत्यंत वेगाने करत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाज पत्रकात ठरवून दिल्याप्रमाणे करण्यात येत नसुन कामाचा ठेकेदार हा निविदेप्रमाणे गिरणेची वाळु न वापरता ज्या नदीच्या पुलाचे काम सुरू आहे, त्याच नदीच्या पात्राची माती मिश्रीत वाळु एका यंत्राव्दारे स्वच्छ करून सर्रास वापरत असल्याचे दिसुन येत आहे. याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रेणी २ सी. डी. तायडे यांनी या बांधकामा विषयी कामावर जावुन संबधीत ठेकेदारास शासकीय निवीदे प्रमाणेच गिरणा नदीच्या वाळुचा बांधकामासाठी वापर करावा, अशी सूचना दिली असतांनाही संबधीत ठेकेदार हा कुणालाही न जुमानता सर्रासपणे माती मिश्रीत वाळुचा वापर करीत असल्याने भविष्य काळात या पुलाच्या बांधकाम गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हे बांधकाम थांबवावे, आणी ठेकेदारास निविदेप्रमाणे वाळु वापरण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य व विरोधी गटनेते शेखर पाटील यांनी या निवेदनातून केली आहे.

Add Comment

Protected Content