महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त प्रश्नमंजूषा कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र, जळगाव येथे अभिवादन व प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संमिश्र केंद्राचे अधीक्षक डॉ. किरण शिरसाठ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रश्नमंजूषा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महात्मा गांधी यांचे विचार, कार्य आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरे दिली.

कार्यक्रमास डॉ. किरण शिरसाठ, अक्षय महाजन, तसेच MSW चे प्रशिक्षणार्थी निलेश बोरा उपस्थित होते. तसेच, या उपक्रमासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. “महात्मा गांधी यांचे विचार आणि तत्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा उपयुक्त ठरतात,” असे मत उपस्थित मार्गदर्शकांनी व्यक्त केले.

Protected Content