फैजपूर प्रतिनिधी । संपूर्ण मानव जाती सहित पर्यावरण व वसुंधराच्या संरक्षणासाठी दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांची उकल करण्याचे महत्कार्य संशोधकांच्या हाती असते. यासाठी समाजातील समस्या ओळखून त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन केल्यास देश व जगाच्या विकासात मोलाची भर पडेल, असे मत डॉ. एस. व्ही. जाधव यांनी व्यक्त केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी अंतर्गत आयोजित पाच दिवसीय टारगेट पीएचडी एंट्रन्स टेस्ट ऑनलाइन कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
यावेळी लेफ्ट डॉ. राजेंद्र राजपूत, कार्यशाळेचे सहसमन्वयक प्रा दीपक पाटील व जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील सुमारे 42 संशोधक उपस्थित होत.
धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर तर्फे दिनांक 17 जानेवारी पासून 21 जानेवारी 2022 दरम्यान पीएचडी पात्रता प्रवेश परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परिपत्रकानुसार सर्व टॉपिक वर सखोल मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
समारोप प्रसंगी सहभागी संशोधकांनी समाधान व्यक्त करीत व्यवस्थापन, प्रशासन आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम हाती घ्यावेत व विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या पाच दिवसीय विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ, सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.