यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खु॥ येथील ग्रामपंचायत सचिव भरतीसाठी मनमानी करून आपल्या मर्जीतील सचिव नेमणूक केल्याप्रकरणी यावल पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांचेकडे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असून अद्यापपर्यंत चौकशी केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात लिपिकांची सेवेत नियुक्ती बेकायदेशीर आहे. सुरेश सोनवणे यांनी 140 ग्रामस्थांच्या सही ग्रामपंचायत सरपंच गटविकास अधिकारी यावल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, दि.30 एप्रिल 2019 रोजी सुरेश सोनवणे हे सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून ग्रामपंचायतीचे लिपिकांचे पद रिक्त आहे. यापदावर कुणालाही विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या मुलाला घेण्यात आले आहे. नियमानुसार हे चुकीचे आहे. या रिक्त जागेसाठी तरुणांनी ग्रामपंचायतीकडे नोकर भरतीसाठी अर्ज केले होता. त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात आलेला नसून या तरुणाची भरती करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांवर हा अन्याय झालेला आहे. त्यानुसार गावातील तरुणांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केले होते ज्या व्यक्तीस या पंचायतीमध्ये सेवेत घेण्यात आले त्या इसमाचा कुठलाही अर्ज नसताना त्याला घेण्यात आले आहे. असा आरोप या लेखी तक्रारीत करण्यात आलेला आहे. बापू साळुंखे यांचे ss140 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.