पुढील वर्षी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार

tokyo olympics 2020 jpg

 

टोकियो वृत्तसंस्था । उन्हाचा नाहक त्रास केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या अनेक देशांमध्ये सुध्दा सहन करावा लागतो. पुढील वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान टोकियोमध्ये होणार असून जुलैत जपानमध्ये तीव्र उन्हाळा असणार असल्याचा अंदाज तेथील हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे.

फ्रान्सच्या राजधानी पॅरिससह युरोपचे बरेच शहराचे तापमान 40 अंशावर गेले आहेत. जपानच्या टोकियो शहराचे चित्र देखील असेच आहे. पुढील वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मधील 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान जपानची राजधानी असलेल्या टोक्यो शहरात होणार आहेत. परंतु जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचे तापमान असणार असल्याचे तेथील हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांना देखील ह्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी आयोजकांना याबाबत कल्पना देखील दिली आहे. तसेच ऑलिम्पिक मधील मॅरेथॅान सारख्या स्पर्धा जुलै- ऑगस्टच्या ऐवजी एप्रिल महिन्यात सकाळी लवकर घ्यावी असा सुचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी (2018) जुलैमध्ये उन्हाळ्यामुळे सर्वात जास्त मृत्यूची नोंद झाली. कारण उष्णतेमुळे आणि हवामानाशी संबंधित कारणामुळे 300 पेक्षा जास्त लोक मरण पावले होते. तर उष्णतेमुळे 54 हजाराहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यात टोक्यो शहरातील 4 हजार 430 लोकांचा समावेश होता. या कार्यक्रमाला अद्याप 1 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, परंतु वातावरण थंड कसे ठेवले जाईल याची उपाययोजना 150 स्वयंसेवकांची नेमणुक करुन सुरु केली आहे. उन्हाळ्यात स्टेडियम किंवा कार्यक्रमाच्या जवळ एसी, पंखे आणि पाण्याचे कारंजे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड शॉवर, ओपन-एअर बाऊट्ससाठी विनामूल्य बर्फाचे तुकडे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जात आहे.

Protected Content