मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | दुकाने आस्थापनांच्यावरील बोर्ड मराठी भाषेत लावा, अन्यथा १० जूनपासून कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील दुकानदारांना दिला आहे.
राज्य सरकारने दुकाने आस्थापनांवरील बोर्ड मराठी भाषेतच असावे, असे निर्देश दिले होते. परंतु अजूनही बऱ्याच दुकानांच्या पाट्या इंग्रजी भाषेत आहेत. शहरात यापूर्वी ज्या दुकानावर मराठी भाषेतील बोर्ड नाहीत अशा दुकानदार आस्थापनांना मोठ्या ठळक अक्षरात मराठी नवे लिहिली जावीत असे आदेश देत मुंबई
महापलिकेने ३१ मे पर्यंत मुदत दिली होती. तरी देखील अनेक दुकानावर इंग्रजी बोर्ड दिसून आले आहेत. अशा दुकानदारांना हि अखेरची संधी असून १ जून पासून कारवाई न करता मराठी भाषेत बोर्ड लावण्यासाठी दुकानदार आस्थापनांना १० जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. १० जून नंतर महापालिका प्रशासन मात्र कठोर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दारू दुकानावरील महापुरुष, किल्ले आदि नावे लिहिण्यावर बंदी असून असलेली नावे बदलण्यासाठी १० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुकाने आस्थापनांनी मराठी बोर्ड लावलेत किवा नाहीत यासाठी ७५ वार्ड निरीक्षक आणि अधिकारी नियुक्त असून वार्डनिहाय निरीक्षण केले जाईल. मराठी बोर्ड लावण्यास नकार देणाऱ्या दुकाने आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोर्ट कारवाईतून वाचला तरी दुकानातील कार्यरत प्रती व्यक्तीनुसार दंडात्मक कारवाई केली जाणर असल्याचेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे.