पानटपरी नाल्यात ढकलून देत ऐवज लांबविला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरातील लेंडी नाल्याजवळ पानटपरी फोडून २५ हजाराहून अधिकचा मुद्देमाल चोरून नेवून टपरी नाल्याच्या कडेला ढकलून दिल्याची घटना गुरूवारी ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. यासंदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश चंद्रकांत साळुंखे रा. काचन नगर, जळगाव हे पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची कांचन नगरातील लेंडी नाल्याजवळ पानटपरी आहे. गेल्या काही दिवसांपासून पानटपरी बंद होती. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री पानटपरी फोडून यातील अंदाजे २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व रोकड चोरून नेला. एवढेच नाही तर चोरट्यांनी ही टपरी नाल्याच्या काठावर ढकलून दिली आहे. ही घटना गुरूवारी ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आली. यासंदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले आहे.

Protected Content