चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी शनिवारी (3 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीएल पुरोहित यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. राजीनाम्यामागे त्यांनी वैयक्तिक कारणे दिली आहेत.
प्रदीर्घ काळापासून भाजपशी संबंधित असलेले पुरोहित यांची 21 ऑगस्ट 2021 रोजी पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते 2017 ते 2021 पर्यंत तामिळनाडू आणि 2016 ते 2017 पर्यंत आसामचे राज्यपाल होते. पुरोहित यांचा जन्म 16 एप्रिल 1940 रोजी राजस्थानच्या नवलगढ येथे झाला.