भुसावळ, प्रतिनिधी | मध्य रेल्वे भुसावळ विभागाने भुसावळ विभागाच्या खंडवा स्टेशनवर विना टिकट व अयोग्य तिकिट प्रवास रोखण्यासाठी आज सोमवार २५ नोव्हेंबर रोजी तिकीट तपासणी करण्यात आली. यात ३५८ प्रवासी अनियमित प्रवास करतांना आढळून आले त्यांच्याकडून १ लाख ९६ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर.के. शर्मा आणि सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक अजय कुमार (टी.जा) यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी करण्यात आली.खंडवा स्थानकात या तिकिट तपासणीत एकूण २८ तिकीट तपासणी पथके आणि ७ रेल्वे संरक्षण दलाचे जवान सहभागी झाले होते. या तपासणीत ३५८ प्रवासी अनियमित प्रवास करत असल्याचे आढळले. या प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेमध्ये तिकिटाविना प्रवास केल्याच्या ७९ केसेसमध्ये ५६ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर अनियमित प्रवास करणार्या २७९ जणांना १ लाख ४० हजार २७०रुपयांचा दंड आकारण्यात आला. या मोहिमेमध्ये मुख्य तिकिट निरीक्षक तपासणी वाई. डी. पाठक यांच्यासह एटीएस पथक, आयसीपी चेक, सजनंग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना नेहमीच योग्य तिकिट घेऊन प्रवास करण्याची विनंती केली जात आहे.