जळगावात बसच्या जोरदार धडकेत पदचारी वृध्द गंभीर

Accident

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या बसने 75 वर्षीय पदचारी वृध्दास बसने धडक दिली. या आपघात ते जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, रज्जाक पठाण (वय ७४, रा.ओमशांती नगर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. पठाण हे काही कामानिमित्ताने खोटेनगर स्टॉप परिसरात आले होते. महामार्गाच्या शेजारुन जात असताना त्यांना रावेर-कल्याण बसने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. नागरीकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. अरुंद महामार्ग तसेच बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. दरम्यान, रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता खड्डा चुकवत असताना निलेश ठाकरे या दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाला होता. यात निलेश गंभीर जखमी झाला. यानंतर सोमवारी पठाण यांचा अपघात झाला. महामार्गावर अपघातांची मालीका सुरूच असून प्रशासनाकडून उपाय-योजना होत नसल्याच्या भावना नागरीक व्यक्त करीत आहेत.

Protected Content