राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळयात पुणेरी शंखनाद

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. निमंत्रणे पाठवली जात आहेत. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांनी बनवलेले वस्त्र वापरण्यात येणार आहे. त्यासाठी 13 दिवस हे अभियान राबवण्यात आले. त्यात दहा लाख लोकांनी सहभाग घेतला. ‘दो धागे श्री राम के लिए’ या अभियानात लोकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामचे वस्त्र तयार केले. त्यानंतर पुणेकरांचा आणखी सन्मान झाला आहे. पुणे शहरातील मंडळी अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख नांद करणार आहे. त्यासाठी केशव शंखनाद टीमच्या 111 जणांना आमंत्रण दिले गेले आहे.

पुणे येथील शंखनाद टीमला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख वाजवण्यासाठी आमंत्रण दिले आहे. केशव शंखनाद टीमच्या सदस्यांना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीचे महासचिव चंपत राय यांनी आमंत्रण दिले आहे. टीमचे अध्यक्ष नितिन महाजन यांना यासंदर्भात पत्र मिळाले आहे. मंदिराचा प्राण प्रतिष्ठा समारंभ 18 जानेवारी रोजी सुरु होणार आहे. त्यानंतर 22 जानेवारी रोजी मंदिरात भव्य समारंभ होणार आहे. यासाठी पुणे शहरातील केशव शंखनाद टीमचे 111 जण जाणार आहेत.

नितिन महाजन यांनी सांगितले की, पुणे येथील मंदिरांमध्ये ‘शंखनाद’ अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. केशव शंखनाद टीममध्ये 500 जण संगीतमय शंखाचा निनाद करतात. त्यात 90 टक्के महिला आहेत. अगदी 5 वर्ष वयापासून ते 85 वर्ष वयापर्यंतचे सदस्य टीममध्ये आहे. यासाठी टीमचे 111 सदस्य 18 जानेवारी रोजी अयोध्यात पोहचणार आहे. पुणे शहरात सुरु असलेल्या ‘दो धागे श्री राम के लिए’ अभियानानंतर शंखनाद करण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पुण्यात ‘दो धागे श्री राम के लिए’ यासाठी 10 लाख लोकांची सहभाग घेतला होता, असे अभियानाचे आयोजक अनघा घैसास यांनी सांगितले.

 

Protected Content