रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर रेल्वे स्थानकावर पुणे-दानापूर एक्सप्रेसला अखेर थांबा मिळाल्याची एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे रावेर तालुक्यातील प्रवाशांमध्ये, विशेषतः जळगावकडे शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध प्रवासी संघटना या थांब्याच्या मागणीसाठी संघर्ष करत होत्या.

रावेर स्टेशनवर सकाळी अप/डाउन गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रवासी संघटनांनी रेल्वे विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली होती. रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा अंतर्गत गाड्यांचा थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा केल्यामुळे थांबा मिळाला आहे. व सर्व जनतेने रक्षा ही खडसे यांचे आभार मानले आहे

प्रवासी संघटनांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि रेल्वे विभागाच्या गरजेची दखल घेत, मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्तक्षेपामुळे पुणे-दानापूर एक्सप्रेसला रावेरमध्ये थांबा मिळवून देण्यात आला आहे. हा निर्णय रावेर तालुक्यातील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा आहे.
या थांब्यामुळे प्रवाशांना प्रवासात मोठा फायदा होईल, असे स्थानिकांनी सांगितले. भविष्यातील रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. यासोबतच, रावेर तालुक्यातील अप/डाउन करणाऱ्या प्रवाशांकडून कटनी पॅसेंजरची डाऊन वेळ बदलण्याची, तसेच महानगरी, झेलम आणि सचखंड एक्सप्रेसलाही रावेरमध्ये थांबा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



