Home Cities जळगाव पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘दो बुंद’ पोलिओ डोस देऊन, पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘दो बुंद’ पोलिओ डोस देऊन, पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | वैद्यकीय महाविद्यालयात आज 3 मार्च रोजी नवजात बालकांना ‘ दो बुंद ‘ पोलीओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर उपस्थित होते.  देशभर 3 मार्च रोजी पल्स पोलीओचे नवजात पालक ते पाच वर्षाच्या बालकांना हा डोस देण्यात येतो. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणाचे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांच्या नियोजनात हे काम सुरु आहे.


Protected Content

Play sound