बोदवड प्रतिनिधी । श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था संचलित राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधू-वर मेळावा नुकताच संपन्न झाला असून या मेळाव्यातील सहभागी वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.
वधू-वरांसाठी स्वच्छतेने प्रकाशन आ.चंद्रकांत सोनवणे, माजी आ. चोपडा तसेच संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नामदेव गुरुजी, रामचंद्र सोनवणे, वासुदेव सोनवणे, कोडू कोळी, संदीप कोळी, सुरेश कोळी, सुभाष सोनवणे, अनिल देवकर, माणिक सोनवणे, निंबा सोनवणे, भरत पाटील, किशोर कोळी, गोलू सोनवणे, समाधान कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तरी समाज बांधवांनी शिवम बिल्डर्स अँड डेवलपर्स डॉक्टर पराग चौधरी, शेजारी विजय टायपिंगच्या बाजूला विसंजी नगर जळगाव येथून पुस्तक घेण्यासाठी समाज बांधवांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.