यावल प्रतिनिधी | नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दहिगाव इथले कवी ज्ञानेश्वर पाटील यांच्या ‘आशीर्वाद’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रमुख अतिथी कवी कट्टाचे अध्यक्ष राजन लाखे, प्रसाद देशपांडे व संजय सिंगलवार यांचे हस्ते अनेक कवी लेखक यांचे उपस्थितीत ‘आशीर्वाद’ या कवितासंग्रहाचे संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
यापूर्वी आदर्श विद्यालय तसेच कोरपावली येथील डी एन हायस्कूलचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कवी ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला ‘संकल्प’ नावाचा कथासंग्रह हा यावल पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी पी पी इंगळे यांच्या हस्ते अगदी घरगुती स्वरूपात प्रकाशित केला होता.