आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मानधनासाठी सीटूतर्फे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात अशा वर्कस व गट प्रवर्तक यांना मिळणारे मानधन सप्टेबर २०२१ पासून बंद करण्यात आले आहे. सदरील मानधन त्वरीत सुरू करावी या मागणीसाठी आशा व गट प्रवर्तक यांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार १० डिसेंबर रोजी महापालिकेसमोर निदर्शने करून आंदोलन केले.

महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय मागणी दिनाच्या निमित्तान राज्यातील सर्व आशांना व गट प्रवर्तकांना कारोना काळात ज्यादा कामाचे मोबदल्यात अशांना १००० रूपये तर गट प्रवर्तक यांना ५०० रूपये दिले जात होते. ही सप्टेंबर २०२१ पासून बंद केलेले आहे. शासनाने तातडीने बंद केलेले मानधन त्वरीत सुरू करावी आणि सदरील रक्कम बँक खात्यात वर्ग करावी, अशा व गट प्रवर्तकांचे थकित पगार तातडीने अदा करावे, राहिलेले प्रशिक्षण त्वरीत देण्यात यावे, मडीसीन कीटस व इतर आवश्यक साहित्या देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर प्रविण चौधरी, शारदा तुपे, विजय पवार, पुनम सपकाळे, आर्या बिरारी, बबिता बावस्कर, ज्योत्सना शिंदे, हेमलता वाणी, अनिता खरात, रत्ना नाथजोगी, जयश्री चव्हाण, यासमिन पटेल, नम्रता तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content