जामनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशात तीन नावे कायदे लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यात झालेला अभ्यासपूर्ण बदल जनतेने समजून घ्यावा असे, आवाहन सामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने 2023 मध्ये कायद्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. कायद्यात फार मोठा असा विशेष बदल नसला तरी काही कलमांमध्ये विस्तृतपणा आलेला आहे. खूप मोठा अभ्यास करून कलमांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षेतही वाढ झाली असून बदल झालेल्या कलमा व कायद्याचा जनतेने अभ्यास करून झालेला बदल समजून घ्याव्या. जेणेकरून लोकांच्या मनात संभ्रम व गैरसमज पसरणार नाहीत. नवीन कलम व कायद्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम जामनेर पोलीस स्टेशन तर्फे हाती घेण्यात आली असून शाळा महाविद्यालय तसेच वेगवेगळ्या कॉर्नर सभा घेऊन याबाबत जनजागृती करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आधी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे पुढे म्हणाले की महत्त्वाच्या तीन कायद्यात सुधारणा करण्यात आली असून भारतीय दंड संहिता ऐवजी भारतीय न्यायसंहिता (बी एन एस) असे करण्यात आले असून सीआरपीसी ऐवजी आता बी एन एस एस तर इंडियन एव्हिडंट अॅक्ट ऐवजी भारतीय साक्षाधी नियम असा बदल करण्यात आला आहे .आयपीसी कलम 323 ऐवजी आता 115 लागणार आहे तर खुनाच्या गुन्ह्यात कलम 302 ऐवजी आता 103 कलम लागू होणार आहे. अशाप्रकारे 323 पासून काही कलमांची व्याख्या बदललेली असून काही मध्ये सुधारणा केलेली आहे. पण नंबर जवळपास सर्व कायद्यांचे बदललेले आहे. कलम 323 पासून 511 पर्यंत ज्या कलमा आहेत त्यांचे नंबर पण आता बदललेले आहेत ही बाब ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. असे सांगून पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले की एखाद्या गुन्ह्यामध्ये हीच कलम लावा असा आग्रह काही नागरिक करीत असतात त्या कलमांचा त्यांना बहुतेक वेळा अभ्यास नसतो. पण कलमा लावण्यावरूनही ते दुराग्रह करतात. यापुढे नागरिकांनी बदल झालेल्या कलमांचा अभ्यास करून नोंद घ्यावी असेही ते म्हणाले. कायद्याचा झालेल्या या बदला बाबत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून अधिकारी वर्गांचेही प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत अशी महत्वपूर्ण माहिती शिंदे यांनी दिली.