जळगावात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध ! (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । राज्यसभेच्य़ा नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळ्याप्रसंगी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. याचाच शिवसेनेतर्फे आज तीव्र जाहीर निषेध करण्यात आला.

शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा अपमान करणाऱ्या व्यंकय्या नायडू यांचा निषेध असो, बजाओ पुंगी, हटाव लुंगी आदी घोषणा दिल्या. व्यंकय्या नायडू यांनी छत्रपतींचा केलेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार लोकशाही मार्गाने देश चालले आहे. जरी तुम्ही भाजपाचे आहात , देशाचे उपराष्ट्रपती जरी असले तरी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. तुम्हाला समजायला हवे होते असे त्यांनी पुढे सांगितले. व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे भोसले हे कोणाचे वंशज आहेत हे लक्षात घ्यावे व त्यांनी त्यांच्याबद्दल चांगले बोलावे ही गोष्ट लक्षात राहावी, यासाठी त्यांना महानगर शिवसेनेतर्फे बदाम पाठविण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना मनपा विरोधीपक्षनेते सुनील महाजन, महिला आघाडी प्रमुख शोभा बारी, मनीषा पाटील, ज्योती शिवदे, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, जाकीर पठाण, विजय बांदल आदींची उपस्थिती होती. या सर्वाना अटक करून सुटका करण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4130331187040035/

 

Protected Content