यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोढाचा जाहीर निषेध

यावल प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर दारूच्या बेधुंद अवस्थेत बिनबुडाचे बेछुट आरोप तावणाऱ्या जामनेर येथील प्रफुल्ल लढा यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले आहे. 

जामनेर येथील राहणारे प्रफुल्ल लोढा यांनी जळगाव येथे हॉटेल फॉर सिजनमध्ये (दि.२५) रोजी मद्यधुन्द अवस्थेत पत्रकार परिषद घेवुन लोढा यांनी राज्याचे माजी महसुल मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या बद्दल बिनबुडाचे बेछुट आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही दिवसापुर्वी प्रफुल्ल लोढा यांनी भाजपाचे आमदार व माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या गैरकृत्याचे पुरावे असल्याचे विधान केले होते. मात्र एकनाथराव खडसे यांनी कोट्यावधी रुपयांचा बिएचआरचा मोठा आर्थीक घोटाळा उघडकीस आणताच गुन्हे अन्वेष्ण विभागाने लोढा व त्यांचे काही मित्र आणी नातेवाईकांवर कार्यवाहीमुळे दुखावल्याने प्रफुल्ल लोढा यांनी मद्यधुन्द अवस्थेत पत्रकार परिषद घेवुन खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोढा यांच्या या बेजबाबदार वक्त्व्याचा व पुणे येथील भोसरी जमीन प्रकरणात तपासात क्लिन चिट मिळालेली असतांनाही राजकीय सुडबुद्धीने खडसे यांच्यावर ईडीची लावण्यात आली. या विषयाचा यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे जाहीर निषेध करण्यात येवुन या संदर्भातील हे कुटील षडयंत्राचा खेळ थांबण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली लिखित तक्रार पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांना देण्यात आले. या प्रसंगी यावलचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, सुकदेवनाना बोदडे, करीम मन्यार, हितेश गजरे, युवक राष्ट्रावादीचे देवकांत पाटील, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, गनी रवान, सईदभाई शेख, कामराज घारू, याकुब तडवी, निवृत्ती धांडे, किशोर माळी, विरेन्द्रसिंग पाटील, अक्रम खान अजमल खान यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content