पाचोऱ्यात संत तुकाराम महाराज जन्मोत्सवानिमित्त जाहीर किर्तन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात कृष्णापुरी भागात मारुती मंदिराजवळ जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती व डॉ. भूषण मगर (पाटील) फाऊंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य जाहीर किर्तनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राष्ट्रीय किर्तनकार शिवभक्त पारायण ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे (बीड) यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी यावेळी अध्यक्षस्थानी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर (पाटील), जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिल मराठे सह रविंद्र रामकृष्ण पाटील, रविंद्र (फौजी) पाटील, संदिप तांबे, विनायक राऊतराय, प्रदिप पाटील, राजेंद्र सुखदेव पाटील, विठ्ठल महाजन (माऊली), चिंतामण जाधव, निवृत्ती पुंड, देविदास साळवे, विनोद पाटील, सुरेश पाटील, हिरालाल पाटील, सुनिल पाटील, गजानन पाटील, दिपक पाटील, नरेंद्र पाटील, हर्षल सौंदाणे, सचिन पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, मनोज महाजन, दिपक शेवरे व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content