जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीतर्फे जनजागृतीपर रॅली (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघाच्या वतीने गेल्या २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सानिमित्त जिल्ह्यात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आज जिल्हा व सत्र न्यायालयात रॅली काढून नेहरू चौकात सांगता आज रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला.

 

याप्रसंगी जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रमुख एस.डी. जगमलानेी यांच्याहस्ते जिल्हा न्यायालयात आज सकाळी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये  २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सानिमित्त जिल्ह्यात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, जळगाव जिल्हा वकील संघाचे कार्यकारी सभासद व पदाधिकारी, तालुका वकील संघाचे सभासद, कार्यकारिणी सदस्य, पॅनल ॲडव्होकेट, रिटेनर लॉयर्स, समांतर विधी सहाय्यक, एस.एस. माणियार व गोदावरी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी, विविध शासकीय विभाग यांनी उत्सफुर्त पणे सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यात वेगवेळ्या पथकाने प्रत्यक्षपणे गावात जावून कायदेविषयक जनजागृती केली होती. तर १२ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक महाशिबीर घेण्यात आले होते. या महाशिबीरात हजारोच्या संख्येने सामान्य नागरीकांपर्यंत विविध शासकीय योजनांची जनजागृती व लाभ मिळवून देण्यात आला.

 

आज रविवारी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा व सत्र न्यायालयाने न्या. एस.डी. जगमलानी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅनी कोर्ट चौक, गोलाणी मार्केट, नेहरू चौक येथे पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाची सांगता करण्यात आली. या रॅलीत जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲङ केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे, महापौर जयश्री महाजन, सचिव ॲड. दर्शन देशमुख, उपाध्यक्ष ॲड. प्रभाकर पाटील, ॲड.एल.व्ही वाणी, सरकारी वकील ॲड. प्रदीप महाजन, ॲड. सुनिल चौरडीया, ॲड.वैशाली बोरसे, ॲड. विजय दर्जी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक रविंद्र ठाकूर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

Protected Content