सावखेडा बु येथील जवान शहिद

पाचोरा प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु येथील जवान चकमकीत शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

शनिवार १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे देशसेवा करत असतांना चकमकीत मंगलसिंग परदेशी हे शहिद झाले आहे. या घटनेमुळे सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ता. भुसावळ सह परीसरात मोठी शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिलट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

 

पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – ३५) हा सन – २००५ मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भर्ती झाल्यानंतर त्याने सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन – २०१४ मधे त्याचा मोंढाळे ता. भुसावळ येथील मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यास दोन मुली व एक मुलगा असे तीन आपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग जयसिंग सोबतच राहत होते.

 

मंगलसिंग जयसिंग परदेशी हा दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आला होता.  ३० ऑक्टोबरला  सुटी संपल्यानंतर पठाणकोट येथे सेवेत हजर झाला होता. या वर्षातील डिसेंबर अखेर सुटी संपल्याने गावी चार ते पाच रविवारी भैरवनाथाची यात्रा भरत असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात यात्रेसाठी एक महिन्याच्या सुटी घेऊन कुटूंबीयासह सुटीवर येणार असल्याचे जातांना सांगून गेला होता.

 

मंगलसिंग जयसिंग परदेशी याचा स्वभाव सतत हसरा व मनमिळावू होता. मंगलसिंग शहिद झाल्याने गावाता शोककळा पसरली आहे. उद्या सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Protected Content