जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा पोलीस स्थानकात कार्यरत उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना आज विशेष सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले.
आज जळगावात शासकीय ध्वजारोहण ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पार पडले. यानंतर आयोजीत कार्यक्रमात विविध मान्यवरांसह शासकीय कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. यात सावदा पोलीस स्थानकात पीएसआय अर्थात उपनिरिक्षकपदी कार्यरत असणारे समाधान गायकवाड यांचा विशेष गौरव करण्यात आला.
समाधान गायकवाड यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले असून आज हेच पदक ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, सहायक अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष सेवा पदक प्राप्त झाल्याबद्दल समाधान गायकवाड यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत करण्यात येत आहे.