मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणने लोडशेडींग न करता शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतातील पिके सुकायला लागले आहेत शेतकरी बांधवाना आपल्या पिकांना विद्युत मोटारी द्वारे विहिरीचे पाणी द्यावे लागते परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे राज्य शासनाने शेती पंपाला आठ तास विज द्यायची घोषणा केली आहे परंतु मुक्ताईनगर परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे विज येताच झिरो लोड मुळे त्वरित विद्युत पुरवठा खंडित होतो दिवसातून दोन तास सुद्धा शेती पंपाला सुरळीत विज मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे
या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांसह मुक्ताईनगर येथील विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय गाठले. याप्रसंगी त्यांनी अधिक्षक अभियंता श्री. गुप्ता यांना शेती पंपाच्या अनियमित विद्युत पुरवठा बाबत विचारणा केली यावर श्री. गुप्ता यांनी तालुक्याला अपुर्या विजेचा पुरवठा होत असल्या कारणाने हि समस्या उद्भवत असल्याचे सांगितले.
यावर रोहिणीताई खडसे यांनी संताप व्यक्त केला यावेळी त्या म्हणाल्या शेतकरी बांधव पिकांना पाणी देण्यासाठी विजेच्या वेळेवर रात्री अपरात्री शेतात जातो विज येते आणि झिरो लोड मुळे लगेच गायब होते त्यामुळे विहिरीत पाणी असून सुध्दा पिकांना पाणी देता येत नसल्या कारणाने पिके सुकत आहेत त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत जर राज्य सरकार घोषणा करुन सुद्धा शेती साठी आठ तास सुद्धा सुरळीत विज देऊ शकत नसेल तर विज मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, तात्काळ सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोहिणीताई खडसे यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु. डी पाटिल, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती माजी सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर,राजेंद्र माळी, बबलू सापधरे, प्रविण कांडेलकर यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते