महापूरात झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या; राष्ट्रवादीचे निवेदन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील नागझरी नदीला महापूर असल्यामुळे रावेर शहरात अनेक लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामे करून देखील अद्यापपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तातडीने ही भरपाई देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक असे की, रावेर शहरात ५ जुलै २०२३ रोजी नागझीरी नदीला महापुर आल्यामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीचे शासनाकडून पंचनामे सुध्दा झालेले आहेत, परंतु सदरचे आपादग्रस्त लोकांना शासनाकडून अजुन पर्यंत कोणतीही आर्थिक  मदत झालेली नाही. तरी जळगाव मेहरून भागात सुध्दा त्याच वेळेस पुरामुळे बऱ्याचा लोकांचे नुकसान झालेले होते तरी वरील नुकसान धारकांना शासनाकडून मदत उपलब्ध झालेली आहे.

 

०५ जुलै २०२३ रोजी झालेल्या पावसामुळे नागझीरी नदीला आलेल्या पुरामुळे ज्या लोकांचं नुकसान झालेले आहे व ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले आहे. लोकांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून द्यावी. अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी निवेदनातून दिला आहे.

Protected Content