जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्रीय दिनानिमित्त दिव्य मराठीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘प्राऊड महाराष्ट्रीयन-2019’ पुरस्काराने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा आज जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात पारख प्लेक्सस रिअयल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक विनय पारख यांचा देखील विकासात मोलाचा वाटा असल्याने त्यांचा देखील आज पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने जाहीर केलेले ‘प्राऊड महाराष्ट्रीयन-२०१९’ सन्मान बुधवारी १५ मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता नियोजन भवनात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते मान्यवरांना गौरव करण्यात आला. सामाजिक कार्य आणि खान्देशच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचे कार्यकर्तृत्वाचे नेहमीच विविध बातम्यांच्या स्वरूपात प्रकाशित होत असते. त्याही पुढे जाऊन सामाजिक दायित्व म्हणून अशा प्रतिभावंतांना एकत्र करून त्यांचा सन्मान करण्यासाठी या ‘प्राऊड महाराष्ट्रीयन’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिक्षण, कृषी, साहित्य, पर्यावरण, उद्याेग अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींची त्यासाठी निवड करण्यात आली होती.