जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव महापालिकेसमोर गुरूवारी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन केले. यात हा कायदा हिंदूंच्या जमीनी घशात घालण्याचा कट असल्याचा आरोप प्रशांत जुवेकर यांनी केला आहे.
वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी आहे. परंतू या ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्ती देखील सहज बळकावता येते. हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, संविधानविरोधी काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा.
यावेळी हातात फलक घेऊन कायदा रहित करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणेमुळे हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि अन्य गैरमुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार मिळाले आहेत. वक्फ कायदा रद्द करावा, वक्फ बोर्डाने अधिग्रहित केलेल्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव महापालिकेसमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरूवारी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/466690952106229