छत्रपती संभाजीनगर येथे नीटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशभर गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील (नीट) कथित गुण घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांनी सोमवारी येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

दप्तरांसह आलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हातात, आम्हाला न्याय द्या, चोरी हो गयी मेरी सीट, घोटाळे करणे थांबवा, माझे भविष्य वाचवा, मला डॉक्टर बनायचे आहे, अशा अनेक फलकांनी लक्ष वेधून घेतले. दोनशे ते चारशेपेक्षा अधिकच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. नीटमधील गुणांचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेला असून, एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभारून विद्यार्थ्यांनी अत्यंत संताप व्यक्त केला.

Protected Content