Home Cities जळगाव पाण्यासाठी कांचननगरवासी धडकले महापालिकेत ( व्हिडीओ )

पाण्यासाठी कांचननगरवासी धडकले महापालिकेत ( व्हिडीओ )

0
34

जळगाव प्रतिनिधी । पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा या मागणीसाठी आज शहरातील कांचनगरातल्या नागरिकांना महापालिकेवर हंडा मोर्चा काढला.

याबाबत वृत्त असे की, सध्या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यातच कांचन नगरातील लक्ष्मी नारायण मंदिर परिसरातील नागरिकांनी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागातील पाईपलाईन नादुरूस्त झाल्यामुळे गत एक महिन्यापासून ही अडच येत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी या परिसरातील स्त्री-पुरूषांनी आज थेट महापालिकेवर हंडा मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. आंदोलकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त उदय टेकाळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समस्या निराकरण करण्याचे आश्‍वासन दिल्याने मोर्चेकरी परतले.

पहा : कांचननगरातील नागरिकांनी काढलेल्या हंडा मोर्चाचा व्हिडीओ.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound