जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी जेष्ठ नेते एकनाथराव खडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सध्या ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू असून खडसेंच्या समर्थनार्थ जामनेर राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला असून यासंदर्भातील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे माहिती असुनही विनाकारण त्यांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारकडुन केला जात असुन जेष्ठ नेत्याला त्रास देणे कितपत योग्य आहे. हिच भाजपाची संस्कृती आहे का ? यापूर्वीही खडसे यांची आयकर, झोटींग सारख्या माध्यमातून चौकशी करण्यात आली असुन काहीच निष्पन्न झाले नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.मग केंद्रातील भाजपाकडुन आता हा अट्टाहास का असा प्रश्न करीत जामनेर राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजित करून करण्यात तिव्र निषेध व्यक्त करण्यात येवून निवेदन देण्यात आले.
संजय गरूड, वंदना चौधरी, विलास राजपुत, भगवान पाटील, प्रदिप लोढा, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, दिलीप पाटील, संदिप हिवाळे, माधव चव्हाण, व्हि.पी.पाटील, विनोद माळी, जितेश पाटील, सागर कुमावत आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.