नालासोपारा येथे रेल्वे रोकोच्या माध्यमातून पाकचा निषेध

मुंबई प्रतिनिधी । पुलवामा येथील हल्ल्याचा निषेध म्हणून आज सकाळी नालासोपारा येथील स्थानकावर प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले.

आज सकाळी आठ वाजेपासून नालासोपारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन करून पाकिस्तानचा निषेध केला. यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याप्रसंगी हजारो प्रवाशांनी रेल्वे रूळांवर उभे राहून पाकिस्तानचा निषेध व्यक्त करणार्‍या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाकला धडा शिकवण्याची मागणीदेखील आंदोलकांनी याप्रसंगी केली.

Add Comment

Protected Content