नवी दिल्ली । केंद्र सरकारने संमत करून याला कायद्यात रूपांतरीत करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला विरोध सुरूच असून आज इंडिया गेटवर ट्रॅक्टर जाळून याचा निषेध करण्यात आला.
कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. यामुळे आता याला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आज सोमवारी सकाळी काही जणांनी शेतकरी विधेयकाच्या निषेधार्थ दिल्लीतील इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध केला.
सकाळी साडेसातच्या सुमारास सुमारे लोकांचा जमाव इंडिया गेटजवळ शेतकरी विधेयकाचा निषेध करण्यासाठी जमला. ते एक जुना ट्रॅक्टर घेऊन आले होते. ट्रॅक्टरला आग लावल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली. अग्निशमन विभागाने ट्रॅक्टरची आग विझविली आहे. आग विझविल्यानंतर ट्रॅक्टर तेथून काढण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.