मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. त्या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळातील संभाव्य खातेवाटप समोर येत आहे.
महाशिवआघाडीतील या सरकारमध्ये शिवसेनेला अपेक्षित असलेले मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचे संभाव्य खातेवाटप समोर आले होते. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हं आहेत. युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची शालेय शिक्षणमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.