Home Cities एरंडोल पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी प्रा.सुधीर शिरसाठ तर सचिवपदी राजधर महाजन

पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी प्रा.सुधीर शिरसाठ तर सचिवपदी राजधर महाजन


एरंडोल (प्रतिनिधी) येथे नुकतीच जिल्हा पत्रकार संरक्षण समितीची बैठक जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी एरंडोल तालुका पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी प्रा.सुधीर शिरसाठ तर सचिवपदी राजधर महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

बैठकीत नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष शिरीष विंचुरकर,सहसचिव विजय पाटील,खजिनदार पिंटू राजपुत,कासोदा शहर प्रमुख केदार सोमाणी,सदस्य संदीप पाटील,प्रशांत सोनार,दिपक पवार,राहुल मराठे,राहुल शिंपी,बाबुलाल माळी,संजय चौधरी,दिपक पवार,प्रल्हाद पाटील,कार्यालयीन प्रमुख संदीप वाडीले,सहाय्यक कार्यालयीन प्रमुख अरुण नेटके,कायदेशीर सल्लागार नितीन चौधरी व सुजित पाठक यांची निवड तसेच कार्यकारिणीच्या जेष्ठ सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी,उदय पाठक व व्ही.के.महाजन यांची तर जेष्ठ पत्रकार रतिलाल पाटील यांची जिल्हा संघटकपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख व नगराध्यक्ष रमेश परदेशी यांना पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने नुतन कार्यालयासाठी नगर पालिकेच्या व्यापार संकुलात जागा भाड्याने मिळावी म्हणुन निवेदन देण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound