नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा. डॉ. अशोक एम. महाजन यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
प्रदीर्घ शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या डॉ. महाजन यांच्या या नियुक्तीमुळे विद्यापीठाला निश्चितच लाभ होईल, अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केली. त्यांनी डॉ. महाजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. महाजन यांनी यापूर्वी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे कुलसचिव म्हणून पाच वर्षे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी.एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी स्वागत करत अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये डॉ. महाजन यांच्या नियुक्तीमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मिळणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.