फैजपूर प्रतिनिधी । सातपुडा विकास मंडळ पाल संचालित, कृषी विज्ञान केंद्र, पाल ता. रावेर यांच्यावतीने “महिला बचत गटातील उत्पादन प्रदर्शन” लोकसेवक मधुकरराव चौधरी स्टेडियम, म्युन्सिपल हायस्कूलमागे, भुसावळ रोड फैजपूर येथे दि.14 व 15 डिसेंबर असे दोन दिवशीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आज अरुणा चौधरी यांचे हस्ते करण्यात आले असून देशाची आर्थिक परिस्थिती बघता महिलांनी मूल व चूल यामध्ये न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. बचत गट हे महिलांसाठी रोजगाराचे उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन अरुणा चौधरी यांनी उद्घाटन प्रसंगी केले
49 महिला बचत गटाचा समावेश
प्रथमच फैजपूर शहरात भव्य दिव्य महिला बचत गटांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात यावल रावेर तालुक्यातून एकूण 49 महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवला होता. यात खाद्य पदार्थ, हातकाम वस्तू, कापडी पिशवी, विणकाम यासह अनेक वस्तूंचे प्रदर्शनात होत्या. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आज शेवटचा रविवार रोजी शेवटचा दिवस असल्याने सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास नगराध्यक्ष महानंदा होले. रावेर बीडीओ सोनिया नाकोडे, जिल्हा दूध संघ संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, तापी परिसर विद्या मंडळ चेअरमन लीलाधर शेठ, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोले, रोहिणी चौधरी, मासाका संचालक नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, नगरसेवक देवा साळी, देवेंद्र बेंडाळे, किशोर सपकाळे, सातपुडा विकास मंडळ सचिव अजित पाटील, योगेश भावसार व विद्या सरोदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.