उल्हास साबळे यांच्याविरुध्द प्रोसेस इश्यू जारी

 

 

53369297

 

जळगाव (प्रतिनिधी) येथील जैन उद्योग समूहाचे मालक अशोक जैन व जनसंपर्क अधिकारी फारुख शेख अब्दुल्ला यांच्याविरुध्द केवळ आर्थिक आरोप केल्यास ते गंभीर वाटणार नाहीत म्हणून उल्हास देवराम साबळे यांनी सर्रासपणे त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण करण्याचे व देशद्रोहाचे आरोप केले आहेत. याबाबत फारुख शेख यांनी येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात अॅड. निशांत अत्रे यांच्यामार्फत साबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यानुसार दखल घेऊन न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदारांचे जवाब नोंदवून फारुख शेख यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने उल्हास साबळे यांच्याविरुध्द ३० एप्रिलपर्यंत जामीनपात्र प्रोसेस इश्यू जारी केले आहे.

Add Comment

Protected Content