पाचोरा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका पाटील

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी दि. २८ रोजी राजीनामा दिल्याने त्यांचे जागी शिवसेनेच्या प्रियंका पाटील यांची ऑनलाईन पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. 

आज दुपारी १२ वाजता प्रियंका पाटील यांनी पालिकेत जावुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावर पिठासिन अधिकारी तथा तहसिलदार कैलास चावडे यांनी ऑनलाईन पद्धतीने चर्चाकरुन प्रियंका पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने उपनगराध्यक्ष पदी निवडुन आल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, न. पा. गटनेते संजय वाघ, सुनिता किशोर पाटील, सुचेता दिलीप वाघ, विकास पाटील, भुषण वाघ, सतिष चेडे, राम केसवानी,  वासुदेव महाजन, धर्मेंद्र चौधरी, हर्षाली दत्तात्रय जडे, मालती बापु हटकर, निलिमा शरद पाटील, रंजना प्रकाश भोसले, रफीक बागवान, लतिफ खान, विष्णु अहिरे, स्वीकृत नगरसेवक डॉ. भरत पाटील, बशीर बागवान, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, राजेंद्र शिंपी, ललित सोनार हे होते. उपनगराध्यक्ष निवडीनंतर प्रियंका पाटील यांचा शिवसेना कार्यालयात सत्कार तर शरद पाटे यांचा निरोप समारंभ करण्यात आला.

 

Protected Content