Home राजकीय प्रियंकांचे रात्रभर कार्यकर्त्यांसोबत मंथन

प्रियंकांचे रात्रभर कार्यकर्त्यांसोबत मंथन

0
36

लखनऊ वृत्तसंस्था । काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल रात्रभर आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत पहाटे पाच वाजेपर्यंत मंथन केले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला.

प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशाची धुरा सोपविण्यात आली आहे. गत दोन दिवसांपासून त्या लखनऊ येथे आहेत. आधी त्यांनी शहरात रोड शो केला. तर काल रात्रभर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रात्री दीड वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल पहाटे पाच वाजेपर्यंत चालली. यात त्यांनी उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या पुनर्गठणाबाबत सविस्तर चर्चा केली. पहाटे पाच वाजता चर्चा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संक्षिप्त वार्तालाप केला. याप्रसंगी त्यांनी चर्चेचा तपशील दिला नसला तरी काँग्रेस जोरदार वापसी करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

दरम्यान, प्रियंका यांच्या राजकारणातील आगमनामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वारे संचारले आहेत. यातच त्यांनी विलक्षण झपाट्याने कामास प्रारंभ केला असल्यामुळे पक्षातील मरगळ झटकली जात असल्याचेही दिसून आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound