पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

जम्मू वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरातील नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असणार्‍या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.  नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली तसंच आपले सैनिक हे भारत मातेचे सुरक्षा कवच असल्याचं म्हटलं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये येथील ब्रिगेडनं जी भूमिका बजावली आहे ती प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

आपले जवान हे भारतमातेचे सुरक्षा कवच आहेत. तुमच्या सर्वांमुळेच आम्ही देशवासीय शांततेत झोप घेऊ शकतो आणि सणासुदीच्या कालावधीत आनंदातही राहतो. मी प्रत्येक दिवाळी ही सीमेवर देशाचं रक्षण करणार्‍या आपल्या सैनिकांसोबत साजरी केली. मी आज या ठिकाणी आपल्या सैनिकांसाठी कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, असंही मोदी म्हणाले.

मी आज पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे. आज पुन्हा तुमच्याकडून नवी ऊर्जा, आशा आणि विश्वास घेऊन जाणार आहे. मी या ठिकाणी एकटा आलेलो नाही, मी १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. दीपावलीचा दिवा तुमची वीरता, पराक्रम, शौर्य आणि त्यागाच्या नावावर प्रत्येक भारतीय त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तुम्हाला कायम अनेक शुभेच्छा देत राहिल, असंही ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आधी आपल्याला तंत्रज्ञानासाठी दुसर्‍यांपुढे झुकावं लागत होतं, अधिक पैसे द्यावे लागत होते. म्हणजेच एक अधिकारी जो फाईल सुरू करायचा तो रिटायर व्हायचा, पण काम पूर्ण होत नव्तं. अशातच शस्त्रास्त्र घाईघाईनं खरेदी केली जात होती. इतकंच नाही, तर स्पेअर पार्ट्ससाठीही आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, असं मोदी म्हणाले.

 

Protected Content