यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावलच्या जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित डॉ जागृती फेगडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी पुजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. जागृती कुंदन फेगडे, सुनील भोईटे, प्रा.डॉ.संध्या सोनवणे, शिक्षक व महाविद्यालयातील इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.