मराठी प्रतिष्ठान व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण अभिमान

tree

 

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान व शहरातील विविध सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर कॉलनी परीसरात वृक्षारोपण अभिमान राबविण्यात येणार आहे.

 

सलग २११ झाडांचे वृक्षारोपण महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वनश्री विजय वाणी व परिसरातील नागरीक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वृक्षारोपण लागवड दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रविवार रोजी सकाळी ११ वाजता स्वामी समर्थ चौक रामेश्वर कॉलनी मेहरुण येथून होईल.

 

सहभागी संस्था व व्यक्ती

 

जगदीशजी व्यास,अतुलभाऊ संघवी, नंदुशेठ अडवाणी, आनंद मल्हारा, सुरेशबाबू जाधवाणी, डॉ महेंद्र काबरे, भगीरथ शाळा १९७१ तुकडी, भगीरथ फ्रेंड्स ग्रूप १९९० तुकडी, हॉटेल रॉयल पेलेस, नवरंग चहा स्व.बसंताबाई कपूरचंद चोरडिया यांच्या स्मृती प्रीत्यर्थ, दाणा बाजार असोसिएशन,सरस्वती फोर्ड.

 

या उपक्रमास नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, सुमीत देशमुख हे अनमोल सहकार्य करत आहेत. तरी वृक्षारोपण अभियान उपक्रमात वृक्षप्रेमी नागरीक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती मराठी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content