संत सावता महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील स्पर्धकांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी | संत सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्याना रविकांत महाराज वसेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी अमळनेर येथे संत सावता महाराज कार्यालयात संत सावता महाराजांचे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी सांगितेले की, संत सावता महाराज यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता महाराज यांनी अध्यात्म, भक्ती, आत्मबोध, लोकसंग्रह, कर्तव्य, सदाचार यांची सांगड घातली. संत सावतामाळी कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा होय. अशी शिकवण देणारे संत सावता महाराज देशातील कर्मयोगी संत होते. वारकरी संप्रदायातील संत म्हणून त्यांचा लौकिक होता. विठ्ठल त्यांचे परमदैवत होते. धर्माचरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा, दांभिकता व बाह्यअवडंबर याबाबत यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही त्यावर सतत प्रहार केला”

ते पुढे म्हणाले की, “संत सावता माळी असे न म्हणता, संत सावता महाराज असा नामोल्लेख करावा त्यांचे काम एका समाजासाठी नव्हते तर ते सर्व समाजासाठी होते. बऱ्याच वेळा संत सावता महाराज पुण्यतिथी असे न म्हणता संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा असा उल्लेख करावा.कारण देशात दोनच संत होऊन गेले की त्यांनी समाधी घेतली आहे त्यात माऊली व दुसरे संत सावता महाराज होय.”असे सांगत त्यांनी समाजातील बांधवांनी व भगिनींनी एक वेळा तरी वर्षातून अरणला संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळाचे दर्शन घ्यावे. असे आवाहन त्यानी केले.

कार्यक्रमात संत सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्योस्ना जाधव यांनी केले. यावेळी संत सावता महाराज यांच्या जीवन चरित्रावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उत्कृष्ट निबंध लेखन करणाऱ्या स्पर्धक देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक ईश्वर महाजन, कु.सानिका प्रमोद जाधव, पर्वताबाई रंगराव चौधरी यांना संत सावता महाराज यांची प्रतिमा, सन्मानपत्र व रोख बक्षीस रविकांत महाराज वसेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी साहित्यिक गोकुळ बागुल लिखीत संत सावता माळी जीवनचरित्र पुस्तक प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा फुले विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला दिलीप पाटील, महेश माळी, उदय खैरनार, मनोहर महाजन, गुलाबराव महाजन, संजय खलाने, नगरसेवक भाऊसाहेब महाजन, प्रा नितीन चव्हाण, प्रा हिरालाल पाटील, ह.भ.प.पंढरीनाथ महाराज, ह भ.प. मुरलीधर चौधरी, अँड नागराज माळी, गोकुळ बागुल, मयूर माळी, खेमराज बोरसे, शिवाजी महाजन यासह पार्वताबाई चौधरी, ज्योत्स्ना जाधव, मोहिनी खैरनार, कल्पना महाजन, कविता महाजन, अनिता महाजन, करुणा महाजन, गायत्री महाजन, नगरसेविका ज्योती महाजन यांची उपस्थिती होती.

Protected Content