जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 131 अर्ज दाखल

SNAIMAGE78683lokshahi Din

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून एकूण 131 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, कृषि, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

 

या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकारी यांना दिल्यात.

Add Comment

Protected Content