नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्र सरकार एलपीजीवर लागणारे अनुदान रद्द करण्याच्या तयारीत असून यामुळे प्रति सिलेंडरसाठी एक हजार रूपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
एलपीजी सिलेंडरच्या अनुदानासंबंधी सरकार दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणार्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही. मात्र याबाबत निर्णय झाल्यास गॅसचे सिलेंडर एक हजार रूपयांवर जाण्याची शक्यता आहे.
देशात सध्या महागाईचा भडका उडालेला आहे. यातच सिलेंडर महाग झाल्यास सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे या निर्णयाला मोठा विरोध होऊ शकतो.