छगन भुजबळांनी निधी विकला ! : शिवसेना आमदार कोर्टात

नाशिक | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकला असून याचे आपल्याकडे पाचशे पुरावे असल्याचा दावा करत शिवसेनेने आमदार सुहास कांदे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

काही दिवसांपूर्वीच भुजबळ आणि कांदे यांच्यात जाहीर वाद झाले होते. यानंतर कांदे यांनी भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

ना. भुजबळ आणि सुहास कांदे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदार असतांनाही त्यांच्यात वाद रंगला असून आता थेट न्यायालयात हे प्रकरण गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content